¡Sorpréndeme!

धोनी बनला फास्ट बॉलर, पाहा कशी केली बॉलिंग | MS Dhoni Latest News

2021-09-13 0 Dailymotion

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, टीमची धूरा कुणाकडेही असो पण मैदानात एमएस धोनी याचं मत फार महत्वाचं ठरतं. टीम इंडियाचे एक नाही तर दोन कॅप्टन असल्याचं अनेकांनी यापूर्वी म्हटलं आहे. एक म्हणजे विराट तर दुसरा म्हणजे धोनी. यावेळी विराट कोहली टीममध्ये नाहीये. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीवर जबाबदारी वाढणार आहे. तुम्ही आजपर्यंत धोनीला मैदानात सिक्सर लगावताना पाहीलं असेल मात्र, त्याला फास्ट बॉलिंग करताना फारच कमीवेळा पाहीलं असेल.धोनी फास्ट बॉलिंग करतो आणि त्याचा नजारा धरमशाला येथे नेट प्रॅक्टीसमध्ये पहायला मिळाला. प्रॅक्टीस करत असताना धोनीने जबरदस्त बॉलिंग केली. जर संधी मिळाली तर आपण चांगली बॉलिंगही करु शकतो हे धोनीने दाखवून दिलं.
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात 3 मॅचेसची वन-डे सीरिज होणार आहे. पहिली वन-डे मॅच धरमशाला येथे रविवारी होणार आहे. दुसरी वन-डे मोहालीत तर तिसरी वन-डे विशाखापट्टनम येथे होणार आहे. त्यानंतर टी-20 सीरिजही खेळली जाणार आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews